Daily Routine / दिनचर्या

आजच्या जगात सर्व लोक धावपळीचे जीवन जगत आहेत त्यात लोकांचे खान्यापिन्यावर दुरलक्ष होत आहे त्यामुळे लाईफ स्टाईल डिसाओरडर जसे लठ्पणा, कोलेस्ट्राल लेवल ब्लड प्रेशर नियंत्रित नसने, डाबेटिज ,हृदय विकार अशे रोगांचे प्रमाण वाढत जात आहे.

  • आयुर्वेदामध्ये वर्णन केले आहे कि
युक्ताहारविहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु।
युक्त स्वपनावबोधस्य योगो भवति दु: हा:

Ø  आहार योग्य नसेल तर औषधाचा काही उपयोग नाही पण योग्य आहार घेतला तर औषधाची गरजच नाही अर्थात योग्य आहार विहार करणे गरजेचे आहे त्यासाठी आयुर्वेदात दिनचर्या हा विषय सांगितला आहे.
o   दिनचर्या काय? तर दिनचर्या म्हणजे रोजच्या जीवनात करणारे आचरण सकाळी उठल्यापासुन ते रात्री झोपे पर्यंतचे कर्म काय करावे हे दिनचर्यामध्ये वर्णन केले आहे.

  • वाग्भटानी सांगितले आहे की
ब्राम्हे मुहुर्ते उत्तिष्ठेत्स्वस्थो रक्षार्थमायुष:
Ø  ब्राम्हे मुहुर्ते अर्थात सुर्योदयाच्या / तास आधी उठावे त्यानंतर गरम पाणी प्यावे. तोंडात रात्रभर असलेली लाळ पोटात गेली तर पचन क्रिया सुरळीत चलण्यास मदत होते.
Ø  पाणी पिऊन झाल्यावर मंजन करावे जेणे करुन दातात साठलेला मळ निघून जाईल गुळण्या कराव्यात मल त्याग करावा.
Ø  पुढे ३० मिनिट तरी प्राणायाम व्यायाम करावा हे केल्याने एक अशी उर्जा निर्माण होईल की दिवस भर उत्साहाने आपले कामे करु शकाल. अंगाला तेलाचा मसाज करावा स्नान करावे. मसाज केल्याने शरीर टवटवीत होते. लहान मुलांना तर आवरजुन मालिश करावी जेने करुन त्यांची वाढ ही उत्तम होते हाडे ही मजबूत बनतात.
Ø  अंगोळ झाल्यावर नाष्टा करावा. नाष्ट्यामध्ये फळांचा रसाचा समावेश नक्की करावा. त्यानंतर आपल्या नेहमीच्या कामाला लागावे.
Ø  दुपारी - वाजता जेवन करावे जेवणात ताक ठेवणे उत्तम. पाणी एवजी जेवताना ताकाचे सेवन करावे.
Ø  संध्याकाळी भोजन हलके करावे. अर्धा पेक्षा कमी पोट बरेल इतके जेवावे.
Ø  थोडक्यात काय तर सकाळी नाष्टा राजाप्रमाणे करावा अर्थात पोट भरुन करावा. दुपारचे जेवन मध्यम म्हणजे मध्याम वर्गीय लोकांप्रमाणे करावे आणि रात्रीचे जेवन हे गरीबाप्रमाणे करावे.
Ø  रात्री जेवन झाल्यावर शतपावली करावी. शतपावली नाही जमल्यास वज्रासन मध्ये -१० मिनिट बसावे.
Ø  झोपताना ग्लास दुध त्यात चमचे तुप घालून सेवन करावे झोप घ्यावी .
Ø  लहान मुलांनी- ते १० तास झोप घ्यावी
Ø  तरुण पिडीनी - ते तास झोप घ्यावी
Ø  वृध्दानी - तास झोप घ्यावी

आरोग्य टिकवण्यासाठी जीवनशैली बदलणे गरजेचे आहे त्यासाठी दिनचर्या पाळणे गरजेचे आहे.

videos on dinacharya Do click on link 
https://www.youtube.com/watch?v=1LNEKRMbBbA
https://www.youtube.com/watch?v=iVyjReA2d9k

ALSO FOLLOW AND SUBSCRIBE ON 
https://www.youtube.com/channel/UCSXfYdLD0-IF4Oh0XmX7rQQ
https://www.facebook.com/pg/Dr-sneha-Dudhal-Honrao-404584390156912/posts/?ref=page_internal

Comments

Popular posts from this blog

Is the composition of Human body just like the composition of Nature?

How to protect your health from Winter Season?

Does Shatadhaut Ghrita help to take care of skin problems? ;IN WINTER